
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आज दि. २३ ऑगस्ट रोजी कृष्णनगरी येथे स्थित सनीज स्प्रिंगडेल शाळेत जणू गोकुळ च अवतरले होते त्याचे कारण होते “ कृष्णजन्माष्टमी “ सोहळा !
यावर्षीही सालाबादा प्रमाणेच स्प्रिंगडेल शाळेत जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला सततचा पाऊस व लागोपाठ येणाऱ्या सुट्यामुळे हा सोहळा उशीरा साजरा केला गेला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत सखी मंचाच्या समन्वय सीमा नंदनवार आणि सत्यम एजुकेशन सोसायटीच्या कोषाध्याक्षा शुभांगी मेंढे उपस्थित होत्या .
सर्वप्रथम पाहुण्याचा हस्ते दीपप्रज्वलन व कृष्णाची पूजा व आरती करण्यात आली व कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर प्ले ग्रुप ते के .जी टू च्या विद्यार्थानी वेगवेगळी नृत्य सादर केली ही सर्व नृत्ये कृष्णालीलांवर
आधारित होती तसेच के .जी वन ची विद्यार्थिनी मानीनी, के . जी टू ची विद्यार्थिनी लावण्या, के .जी वनची परिधी यांनी कृष्णाची माहिती देणारी भाषणे सादर केलीत इयत्ता सहावीचा विद्यार्थी अजिंक्य भागवत याने सुंदरसे गाणे सादर केले यावेळी प्रमुख पाहुन्यांनी सीमा नंदनवार व शुभांगी मेंढे यांनी आपापल्या भाषणातून सर्व विद्यार्थाचे मनापासून कौतुक केले व इतर रंगारंग कार्यक्रम आयोजित केला याबद्दल खूप कौतुक केले .
यानंतर सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम होता गोवीदाचा अनेक गोविंदा हांडी फोडण्यासाठी तयार झाले होते सर्व प्रेक्षकांनी उत्सुकता आणली आणि शेवटी टाळ्यांच्या कडकडात गोपाल कृष्णाने हंडी फोडली व सर्वाना काला वितरीत केला यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्या सोबत प्राचार्या शेफाली पाल के जी प्रमुख कल्पना जांगडे प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकरही उपस्थित होत्या . कार्यक्रमाला सर्व पालकगण मोठ्या संख्येत उत्साहाने उपस्थित होते व कार्यक्रमाचा आनंद घेत होते
मंचावर सर्व राधा व कृष्णा रुपातील विद्यार्थानी दिसत असल्या प्रत्यक्ष गोकुळातच गेल्याचा भास होत होता.
कार्यक्रमाचे संचालन मोनाली चित्रीव व कल्पना घोडीचोरे यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णा धुर्वे यांनी केले.
गोपाल काल्याचा प्रसाद सर्वांना वितरीत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले