
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- वि. वि. कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नगझारी ता.अहमदपूर जि. लातूर येथे नागनाथ महाराज शेतकरी विकास पॅनल चा पूर्ण बहुमताने म्हणजे 13 पैकी 13 सदस्य बहुमताने विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवार मध्ये अंकूश इप्पर, उत्तम मुंढे, दीपक इप्पर, मारोती इप्पेर, रघुनाथ इप्पर, संग्राम इप्पर, सुशील इप्पर, तुकाराम उगीले, महिला उमेदवार वचलाबई इप्पर , रेवता बाई इप्पर, वी, मा, प्र मध्ये बालाजी इप्पर, ओबीसी मध्ये बिनविरोध नाथराव अलापुरे तर अनुसूचित जाती मध्ये नामदेव सुर्यवंशी यांचा बहुमताने विजय झाला.
या यशामध्ये सर्व सुजाण मतदार, नागरिक, आमचे सर्व मार्गदर्शक यांचा सिंहाचा वाटा आहे. पॅनल प्रमुख म्हणुन उधव इप्पर, उपसरपंच यांनी नियोजन केले.
तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व प्रेरणा स्थान, लातूर जील्याची शान आदरणीय मचक इप्पर, आयपीएस, पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड यांचं मार्गदर्शन लाख मोलाचे ठरले.
निवडणूक एकदम शांततेत पार पडली. यशस्वी उम्मेद्वरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..