
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लोहा पोलीस स्टेशन येथे आगामी गणेशोत्सव व पौळा सणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मुख्य मार्गदर्शन करताना केले.
लोहा पोलीस स्टेशनन येथे आज दि.२३ ऑगस्ट रोजी आगामी गणेशोत्सव व पौळा सणाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठकही आयोजक करण्यात आली होती. मुख मार्गदर्शक नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे होते तर प्रमुख उपस्थिती उपस्थिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी मारोती थोरात, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, तहसीलदार व्यंकटेश मुंढे , बीडीओ शैलेश वावळे, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, सा.बा.चे उपविभागीय अभियंता मोहन पाटील पवार, महावितरणचे अभियंता शिवाजी वाघमारे, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, गटनेते करीम शेख,माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, जेष्ठ नागरिक गंगाधर महाबळे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, नगरसेवक केशवराव मुकादम, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, नगरसेवक नबीसाब , नगरसेवक केतन खिल्लारे, खाजगी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, तालुका दुग्ध व्यवसायीक संघाचे चेअरमन ज्ञानोबा पाटील पवार, दिनेश सावकार तेललवार, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, मनोहर पाटील भोसीकर, माजी सैनिक व्यंकट घोडके , यांच्यासह लोहा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सरपंच, उपसरपंच , गणेश मंडळांचे पदाधिकारी पत्रकार बांधव शहरातील नागरिक आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले की, गणेश मंडळांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन केले पाहिजे अंगलट असे कुणी काही करू नये तसेच पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करणार आहेत त्यांचा आमच्या वतीने सत्कार करण्यात येईल तसेच जे गणेश मंडळ उत्कृष्ट देखावा सादर करतील त्यांना बक्षीस देण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले.
तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक,डीवाय मारोती थोरात , तहसीलदार व्यंकटेश मुंढे, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, पत्रकार विलास सावळे, नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांचे ही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
यावेळी आभार पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पांचाळ पांचाळ यांनी केले तसेच
सदरील शांतता समितीची बैठक यशस्वी करण्यासाठी एपीआय शेख,पिएसआय सोनकांबळे , पोलीस कर्मचारी गिरी,शेंबाळे, केंद्रे, बगाडे सह सर्वांनी परिश्रम घेतले.