
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) काळात सर्व शाळा, महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाकडे केली आहे.
दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना (Corona) महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना निवेदन एक दिलं आहे.मनसेने (MNS) निवेदनामध्ये लिहलं आहे की, ‘शासन
निर्णयानुसार राज्यातील धार्मिक सण व उत्सव इत्यादीच्या
12 Y …
(61)
कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी स्थानिक ठिकाणांच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती / पालक शिक्षक संघ यांच्या सहमती अनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सव, दिवाळी व अन्य सण / उत्सव कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करु नयेत अशा सूचना दिल्या आहेत. तथापि राज्य मंडळांच्या शाळां व्यतिरिक्त इतर मंडळांच्या खाजगी शाळांमध्ये सदर सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे.
भाजपवाल्यांना कळालंय मुंबईत बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं नाही – उद्धव ठाकरे
गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई (Mumbai) परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात आपल्या मूळगावी जात असतात. गणेशोत्सवात ५ दिवस सुट्टी जाहीर करावी. तसेच या काळात कोणत्याही परीक्षा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना आपण सर्व शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला द्याव्यात ही विनंती असं मनसेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. मनसेच्या या निवदेनानंतर शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ सर्व शाळांना उत्सव काळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाहीकरण्याबाबत सर्व शाळांना निर्देश देण्यात येतील असे सांगितल आहे.