
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे :गणेशोत्सवात पुणे शहर विविध प्रकारचे व नाविन्यपूर्ण देखावे करण्यात देशात प्रसिद्ध आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा राडा सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. सर्वांची करमणूकही चांगली झाली. एकनाथ शिंदे यांचं गुवाहातील बंडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यासोबत उद्धव ठाकरेंनासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हा सत्तासंघर्ष पुणेकरांना पुन्हा अनुभवता येणार असल्याची माहिती आहे. कारण पुण्यातील नरेंद्र गणेश मंडळाने या सत्तसंघर्षाचा देखावा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या मूर्तीकार सतिश तारु यांच्या स्टुडियोत देखाव्यासाठी साकारण्यात आलेले विविध नेत्यांचे हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण देखाव्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ह्या देखाव्याची कल्पना नवीन व अर्थपूर्ण असल्याने यंदा हा देखावा पहाण्यासाठी प्रेक्षकांसाठी एक आकर्षण बिंदू ठरणार आहे.