
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील आरसोली येथे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनद दि २५ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आरसोली गावच्या सरपंच सुशिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विस्तार अधिकारी व्ही. जे .वाघमारे व शिक्षण विस्तार अधिकारी राहुल भट्टी हे उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील ७० शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये नववी ते बारावी माध्यमिक व सहावी ते आठवी प्राथमिक गट केले होते . यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी तीन क्रमांक व उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी राहुल भट्टी यांनी शाळेची रंग रंगोटी , नवीन बांधलेले सुरक्षा गेट , भौतिक सुविधा , शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगितले . यावेळी मुख्याध्यापिका पी.एस.गवळी , संचालक संजय पाटिल आरसोलीकर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लालासाहेब पाटूळे , केंद्र प्रमुख अंकुश उगलमुगले , अर्जुन गुंजाळ , गटसाध न व्यक्ती योगीराज आमगे , हुंबे , भरमाडे , शिक्षक जीवन आगळे , औदुंबर कोल्हे , तात्या ढोरे , शिक्षिका आगळे , अनत्रे व तालुक्यातील शाळेतील शिक्षक , ग्रामस्थ , विद्यार्थी उपस्थित होते.