
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : शिंदे शिवसेना गटाच्या परभणी महानगर प्रमुखपदी प्रवीण बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई येथील कार्यालय प्रमुख संजय ….. यांनी प्रवीण देशमुख यांना त्यांच्या नियुक्ती विषयीचे पत्र मुंबईत देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देशमुख यांना पत्र देण्यात आले त्यावेळी कळमनूरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर, परभणीचे माजी शिवसेना खासदार तथा संपर्क प्रमुख सुरेश देशमुख, सहसंपर्कप्रमुख भास्करराव लंगोटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचा नुकताच दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही ठिकाणी संपन्न जाहीर कार्यक्रमावेळी मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून कार्यकर्ते व पदाधिकारी यांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. त्याचीच परिणीती म्हणून एकापाठोपाठ एक अशा नवनवीन नियुक्त्या औंढा सपाटा सुरुच आहे.
काही दिवसांपूर्वी परभणीत व्यंकटेश शिंदे यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घेतलेल्या जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात आ. संतोष बांगर व अन्य नेत्यांनी हजेरी लावली त्यावेळी सुद्धा प्रचंड गर्दी उसळली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांसह राज्यात सर्वत्र कमालीचे प्रस्थ वाढत असल्याचे दिसून येत आहे.