
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : जंगली महाराज रस्त्यावर मोबाईल विक्रीचे दुकानाचा दरवाजा उचकटून मोबाईल संच, इतर साहित्य आणि रोकड असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. या बाबत किशोर चौधरी वय ५२, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. चौधरी यांचे जंगली महाराज रोडवर जे. एम. कम्युनिकेशन नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरी केली. मोबाईल दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर मालक चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.