
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील श्री पेढा हनुमान मंदीरात सरती श्रावणी अमावास्या आणि येणारा चातुर्मास यांच्या सुवर्ण मध्यावर सामुहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजिला होता.
कालची पिठोरी अमावस्या, बसवराजांचा पोळा हा सण आणि आजपासून सुरु होणार चातुर्मास या पर्वाच्या औचित्यावर परभणीतील हजारो श्रीराम भाविक भक्तांनी चौदा वेळा सामुहिक हनुमान चालीसाचे पठण केले. महिला व पुरुष भक्तांचा एक सुरातील मधुर व मिलनसार आवाज, टाळ्यांचा कडकडाट आदींच्या गगनभेदी आवाजामुळे मंदीर दणाणून सोडले होते शिवाय परिसरातील नागरिकांचेही लक्ष्य वेधून घेतले होते.
श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्या पुढाकाराने आयोजित या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमास भाविक-भक्तांचा मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय असाच होता.