
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- रामहरी नगर गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संजय गाढवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूरज गाढवे, बालाजी अंधारे,काकासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.रामहरी नगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी आंनद गाढवे तर उपाध्यक्षपदी सचिन साबळे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी विजय गाढवे,सचिव कारण गायकवाड, कार्यकारणी पदाधिकारी अक्षय भोगल, श्रीकांत देशमुख, गणेश गाढवे,अशोक गाढवे आदी पदाधिकारी निवड करण्यात आली.
यावेळी भरत गाढवे,रामभाऊ गाढवे, हरीश गाढवे,समाधान गाढवे,संदीप गाढवे,तानाजी गाढवे,अवधूत गाढवे, दत्ता गाढवे,खंडू गाढवे ,गणेश गाढवे,अश्रू चौधरी आदी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.