
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
डाळज नं १येथील युवा नेते व इंदापूर तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री मकरंद बुवासाहेब जगताप यांची इंदापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे डॅशिंग जिल्हा अध्यक्ष शिवश्री सचिन बाप्पु जगताप यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेड माढा तालुका संघटक शिवश्री बाळासाहेब वागज सर, बारामतीचे उद्योजक निलेशजी निकम, बारामती तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री पै. तुषार तुपे – पाटील, बालाजी इलेक्ट्रीकल्सचे दयानंद जगताप पाटील इ. उपस्थित होते.