
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:आज दिनांक 27.08.2022 रोजी प्रॉपर देगलूर येथिल राजशेखर मंगल कार्यालयात आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री प्रमोदकुमार शेवाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस सहायक पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, विद्यमान आमदार श्री जितेश अंतापुरकर साहेब, मा तहसीलदार कदम साहेब, एम एस इ बी कार्यकारी अभियंता चपलावाड साहेब, नगरपरिषद देगलूरचे अभियंता मार्तंड साहेब हजर होते. तसेच देगलूरचे शांतता समिती सदस्य व सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी असा 500 ते 600 जनसमुदाय हजर होता. मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देउन डि जे वापर न करण्या बाबत कायदेशीर मार्गदर्शन केले.