
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
अर्धापूर येथे घेण्यात आलेल्या ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३५ शाळांनी व त्यांच्या शिक्षकांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शन गुरुवार (ता.२५) मिनाक्षी देशमुख हायस्कूल,अर्धापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात इयत्ता ६ वी ते ८ वीच्या गटातून अक्षरांगण जीवन शिक्षणालय अर्धापूर, शाळेच्या समृध्दी ढगे व वैभवी देशमुख हिने प्रथम तर इयत्ता ९ वी ते १२ वीच्या गटातून जि.प.हायस्कूल लोणी (बु.) शाळेच्या बालाजी कापसे याने व सायली दुधमल हिने प्रथम क्रमांक पटकावला.
विज्ञान प्रदर्शनाचा समारोप पंचायत समिती अर्धापूर, शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी रुस्तुम ससाने यांच्या अध्यक्षतेखाली व विस्तार अधिकारी एल.गोडबोले, निजाम शेख, केंद्र प्रमुख विकास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रदर्शनात इयत्ता ६ वी ते ८ वीच्या गटातून समृध्दी ढगे, वैभवी देशमुख ( अक्षरांगण जीवन शिक्षणालय,अर्धापूर ) प्रथम , मनश्री क्षीरसागर, रुद्राक्ष क्षीरसागर ( जि.प.प्रा.शाळा, दिग्रस ) द्वितीय तर आफिफा मरियम, आरती गव्हारे ( जि.प. हायस्कूल,अर्धापूर ) तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या गटातून बालाजी कापसे, सायली दुधमल ( जि.प.हायस्कूल,लोणी बु.) प्रथम, कशीश फातेमा, माहीन अफसर ( जि.प.हायस्कूल,अर्धापूर ) द्वितीय तर आरती कपाटे, श्रद्धा कपाटे ( जि.प.हायस्कूल,येळेगाव ) तृतीय येण्याचा मान मिळविला.
विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून एम.जी.जाधव, श्रीमती फड मॅडम, डॉ. के.ए.नजम, फाटेकर सर, या शिक्षकांनी काम पाहिले तर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी शाळेचे मुख्याध्यापक टिमकेकर सर, साधन व्यक्ती अनिल जाधव, अंकुश वारे, भालेराव सर, श्रीधर केसराळीकर, गायकवाड, सचिन खिल्लारे, राम कदम सर, संदिप बोबडे सर, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक शिक्षक, व सर्व साधन व्यक्तींचे सहकार्य लाभले. याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी रुस्तुम ससाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनात यशस्वी होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यांनी जपायला हवी. तसेच सातत्याने प्रयोगशीलता जपत नवनवीन बाबी शिकत राहण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अब्दुल रजाक यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आदींची उपस्थिती होती.