
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे पेनूर येथे दि.२९ आॅगस्ट रोजी लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. २९ आॅगस्ट २०२२ रोजी मौजे पेनूर येथे लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी १०.५५ वाजता ध्वजारोहण आ. शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते त्यानंतर सकाळी ११ वाजता जाहिर सभा यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर ( बाळू) पाटील गवते राहणार तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संजय बालाघाटे, प्रा. ज्ञानेश्वर डाखोरे, डॉ. बालाजी पेनूरकर शिवराज दाढेल, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच दुपारी २ वाजता लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या तेल चित्राची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्याने निघणार असून तेव्हा या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांने उपस्थित रहावे असे आवाहन लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.