
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- निवासी अपंग विध्यालय ता.अहमदपूर जिल्हा. लातूर येथे नागेश कृष्णाजी चव्हाण रा. पार ता.अहमदपूर जि. लातूर वय वर्ष ९ हा विद्यार्थी शाळेत शिकत आहे तरी अपंग विध्यार्थी असून या शाळेतील शिक्षक संतोष नलगिरे यांनी दि : २५ /०८/२०२२ रोजी त्या मुलास पेन नाही का तुझ्याकडे या कारणामुळे त्या मुलास जबरदस्त मारहाण केल्याची घटना गणेश दादा हाके पाटील यांच्या निवासी अपंग विध्यालय येथे घडली आहे आणि त्या विध्यार्थी च्या पालकांनी त्या शाळेवरील शिक्षक बालाजी फुलमट्टे सर यांना कल्पना दिली आसता त्यांनी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे समजले आहे आणि मी स्वतः राठोड रमेश दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी मी भेटलो आसता मला बालाजी फुलमट्टे सर यांच्याशी मी आज दि २८/०८/२०२२ रोजी मला म्हटले की अडिओ क्लिप चॅनल ला लावत आहे तर त्यांनी स्पष्ट मला सांगितलंत की लावा काही हरकत नाही आणि पालकांना असे बोलले आहे की पत्रकार यांच्यानी काय होणार नाही या भाषेत पालकांशी बोलले आणि शाळेतील मुख्याध्याप परमेश्वर पाटील सर याना कॉल केला असता त्यांनी सांगितले की मी विचारून सांगतो असे म्हटले
शाळेवर पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असे समजले आहे.
आणि मुलाला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे पेन नाही सर असे सांगीतलो आसता मला संतोष सर यांनी आला छडीने खूप मारले असे सांगितले तरी त्या शिक्षकास निलंबित करून योग्य ते कार्यवाही करण्यात यावी त्या शिक्षकास कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे त्यां मुलाचे नातेवाईक व पालकांनी सांगितले आहे