
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
निमगाव येथील ताना पोळा कार्यक्रमात प्रतिपादन
देगलूर:-ताना पोळा हा बालकांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता व त्यांचा उत्साह वाढविण्याकरिता व स्पर्धेत टिकून राहण्याकरता कशी सजावट करावी लागते हा त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा सण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांनी भंडारा तालुक्यातील पहेला येथून जवळच असलेल्या निमगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ताना पोळा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले. आज दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजता तानापोळा चे आयोजित आयोजन करण्यात आले होते. या ताना पोळा कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व नवयुवक, युवती , स्त्री-पुरुष ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी ताना पोळ्याच्या आनंद लुटण्याकरता हनुमान मंदिर निमगाव येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. यामध्ये गावातील सर्वच बालकांनी आपले नंदीबैल सजावट करून आणले होते .येथील सर्वच नंदीबैल यांना प्लेटचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले .त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय यांना जर्मन डब्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजीव भांबोरे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ , शीलाताई राऊत सरपंच , बालू चवळे उपसरपंच, अंबादास चवळे पोलीस पाटील ,कृष्णाजी चवळे तंटामुक्ती अध्यक्ष, राजकुमार राऊत ग्रामपंचायत सदस्य, गीता धुळसे सदस्य ,वर्षाताई चवळे सदस्य दीपक वानखेडे सुचित राईस मिल पागोरा, राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे भंडारा तालुका अध्यक्ष कुलदीप गंधे, कवडूजी गाढवे, खुशालजी गाढवे, नथुजी लुटे, सुभाष चुधरी, दीपक गंधे विनोद
तूमसरे, सुरज सिडाम, ऋषी धुळसे, रतन धुळसे महेश धुळसे ,अमित शिवणकर, राकेश चुधरी तसेच बजरंगी युवा मंडळ सर्व सदस्य गण तसेच गावकरी, महिला भगिनी, बालगोपाल, मोठ्या संख्येने उपस्थित होते.