
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यात काही दिवसांपासून एकदमच पावसाने उघडझाप दिल्यानंतर शेतामधिल सोयाबीन ,मुग, उडीद, कापुस, तुर ही खरिप हंगामात लागवड केलेली पिके हाती लागण्याची आशा निर्माण झाली होती. या पिकांना फळधारणा पण झाली होती. परंतु गेल्या विस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे, पावसा अभावी ही पिके करपुन जात आहेत .पाऊस पडला नाही तर उरलेली पिके वाया जाण्याच्या मार्गांवर आहेत .गेल्या १५ ते २० दिवसांपासून उन्हाळ्या सारखी गर्मी जाणवत आहे .श्रावण मास संपला असून मृगक्षेत्र पुर्णपणे कोरडे गेले आहे. आता पुर्वानक्षेत्रातील पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पोळा हा सण दरवर्षी पावसातचं होतो, दरम्यान चांगला पाऊस पडला होता .उरलेली पिके हातची जाऊ नयेत यासाठी शेतकरीवर्ग वरुन राजाला प्रार्थना करीत आहेत .किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचे बहुतांश व्यवहार केवळ खरीप पिकांवर अवलंबून असतात. मृगनक्षेत्राच्या मुहूर्तावर सुरु झालेला पाऊस पुढे थांबला नाही. यामुळे खरीपाची पिके वाया गेली आहे. यावर्षी किनवट तालुक्यातील मौजे बोधडी बु., जलधरा, शिवणी, आप्पारापेठ, इस्लापुर मंडळातील गांवच्या शेतकरी बांधवांचा खरिप हंगाम वाया जाते की काय? अशी भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया मिळत आहे. आता पुढील भविष्य निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे .तारणे किंवा मारणे निसर्गाने ठरवावे.