
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णि– श्री.रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सावळी सदोबा-आर्णि पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा , माळेगांव, सुभाष नगर,दहेली, असे परिसरातील काही ग्रामपंचायतीमध्ये कागदावरच ग्रामसभा पार पडत आहेत,काही ठिकाणी ग्रामसभा नावापुरताच होत असून अंमलबजावणीचे काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे, स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत, ग्रामसभेत सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या हक्काची कामे किंवा योजनांच्या संदर्भात माहिती त्याबद्दल नागरिक अन्नभिन्न राहत असल्याने ठरलेल्या दिवशीच ग्रामसभा घेण्याचा आग्रह प्रशासनाने धरावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, वर्षभरात एकूण पाच ते सहा ग्रामसभा घेण्याची प्रशासकीय व्यवस्था असतानाही काही गावांमध्ये एकही ग्रामसभा घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रश्न यादीवर कुठल्याच प्रकारची चर्चा होत नाही, त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ शासकीय योजनांचा लाभापासून वंचित राहत आहे, ग्रामसभा लोकांच्या हक्काची सभा आता अप्रचलित होण्याच्या मार्गावर दिसत आहे कृषी योजनांच्या संदर्भात घरकुल योजना इतर वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या ग्रामसभेत मंजूर केल्या जातात व यासाठी योजना लाभार्थी नावे ग्रामसभेमधून वाचून दाखवली जाते त्याचप्रमाणे ग्रामविकास कामाचा आराखडा घेऊन त्याची माहिती प्रत्येक ग्रामस्थाला मिळणे आवश्यक आहे,या दृष्टीने ग्रामसभेचे आयोजन केले जाते, मात्र काही गावांमध्ये ग्रामसभा नावापुरताच राहल्याचे चित्र पाहायला मिळत आहे