
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – सध्याच्या जगात माहितीचा महापूर आला असताना मानवतेची मूल्ये जपणूक करण्यासाठी परिवर्तनात्मक संघर्ष करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे पुरूष आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर महापुरुषांची ग्रंथ संपदा आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगुंडे केले
माळेगाव याञा येथे लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष हनमंत रुस्तुमराव धुळगंडे तर पाहुणे म्हणुण विलासराव गौकोंडे ,मा सरपंच नागोराव वाघमारे ,मा सरपंच नारायणराव धुळगंडे , शंकरराव जाहगिरदार ,पारोजी वाघमारे, गोपाळ पाटील लक्ष्मीबाई गोकोंडे, मा तं.मु अध्यक्ष प्रल्हाद धुळगंडे ,संजय गाधी शाळेचे मु.अ देशमुख सर ,जि प क्रें,मु.अ.धुळगंडे सर ,विकास जोंधळे ,खांडेकर सर यांच्यासह असंख्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.