
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर; देगलूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री कैलास एजगे यांनी देगलूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भावनिक आव्हान करून शेतकऱ्याला संघटित होण्याचे आवाहन केले आहे .अगोदर महिनाभर अतिवृष्टी अन् आता सलग 20 दिवस पावसाचा खंड… दुष्काळ व अडचणी शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजल्यासारखी… ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहेत… या अडचणींचा पाढा व राग आपण एकमेकांवरच काढत आहोत… पण जी शासन व प्रशासन व्यवस्था वा लोकप्रतिनिधी अशा कठीण काळात आपल्या सोबत असायला हवेत ते मात्र सत्तेची गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत. याला आपण शेतकरीही जबाबदार आहोत. आपण आपल्या भागातील पं.स., जि.प. सदस्य, स्थानिक नेते, आमदार, खासदारांना याबाबत खडसावून विचारण्याऐवजी त्यांची हारतुर्यानी मोठमोठी सत्कार करण्यात मश्गुल आहोत. म्हणून तर हे नेते आपणा शेतकऱ्यांना ग्रहीत धरतात.
शेतात पाणी असूनही MSEB घ्या घाणेरड्या नियोजनामुळे वाळत असणाऱ्या पिकांना पाणी देऊ शकत नाही.. याबाबत कुणीच बोलायला तयार नाही.
25% अडव्हान्स पीकविमा शेतकऱ्यांना मिळू शकतो. याबाबत आपणाला संघटीतपणे लढावे लागेल. तरीही आपण एकत्र येत नाही…
म्हणून तर शासन व प्रशासन आपणास गंभीरतेने घेत नाही.
आता तरी विचार करा माझ्या शेतकरी बांधवानों…,
अन्यथा काळ खूप गंभीर आहे.
असे सामाजिक कार्यकर्ते श्री कैलास एजगे यांनी भावनिक शेतकऱ्यांना आव्हान केलेला आहे. या त्यांच्या भावनिक आव्हानाला देगलूर तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांचे त्यांच्या या भावनिक आव्हाने ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.