दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या धान्याची पावती दिली जात नाही व. नसल्याने, ग्राहकांना धान्य कमी देऊन भुरके, ‘त्यांची बोळवण करण्यात येत आहे. या संदर्भात २ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात एकूण १३६ स्वस्त धान्य दुकानदार असून, त्यापैकी शहरात १६ मा तर ग्रामीण भागात १२० स्वस्त धान्य अवैध दुकानदार आहेत. या दुकानदारांकडून बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना धान्य दिले जाते. मात्र, स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य देताना ग्राहकांना कमी देत आहेत.
संबंधित शिधापत्रिकाधारकाच्या अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर कमी माल दिला जातो. मात्र, या ग्राहकाला किती माल दिला, याचे बिलही दिले जात नाही.
रेशन दुकानात स्पष्टपणे वाचता येईल, असा माहिती फलक असणे बंधनकारक आहे. या माहिती फलकावर रेशन दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोननंबर, एकूण रेशन कार्डची संख्या, भाव फलक या सहित एका लाभार्थ्यास किती धान्य याची संपूर्ण माहिती ठेवणे आवश्यक आहे. मात्र, तालुक्यात काही दुकानदारांकडून या नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अमोल पांडुरंग शिंदे व दत्ता मारोती इबितवार आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, ईपॉज मशीनच्या तक्रारी येत असल्यामुळे धान्य वाटपात विलंब होत आहे. अनेक गावांत या अडचणीमुळे धान्य वाटप झाले नाही. तर दुसरीकडे काही दुकानदार मापात पाप करत आहेत. तरी लवकरात लवकर शासनाने या विषयांमध्ये लक्ष घालून लवकरात लवकर स्वस्त धान्य ग्राहकांना न्याय द्यायचं काम करावे अशी विनंती देगलूर परिसरातील सर्व नागरिकांची केली आहे.
