
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय कराळे
_________________________
परभणी : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
रिपब्लिकन पार्टी तर्फे पुकारण्यात आलेला हा लढा निकराचा असून शासनाने त्यात त्वरीत लक्ष घालून न्याय द्यावा, असेही त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना आज दि. ५ सप्टेंबर २२ रोजी, शिक्षक दिनाच्या औचित्यावर दिलेल्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण दिव्यांनी सेसेन विभागात २० टक्के, अंतर्गत शिलाई मशीन, पीठाची गिरणी, महापालिका ५ टक्के व घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा असेही म्हटले आहे.
जिल्हाभरातील दिव्यांगांच्या विविध संघटनांनी या आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे.