
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
हिंगोली;; जिल्ह्यातील वसमत तालुका टाकळगाव सावित्रीबाई फुले जुनियर कॉलेज येथे सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग अंतर्गत महाविद्यालयात समान संधी केंद्र ची स्थापना करण्यात आली. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरे सर व प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर यांनी समान संधी केंद्राची स्थापना करण्यात केली. सामाजिक न्याय विशेष विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने समान संधी केंद्र समिती गठीत करण्यात आली सदरील समितीचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित पि.के प्राध्यापक टेंबरे एच.डी प्राध्यापक आठवले जी.आर तर विद्यार्थी प्रतिनिधी आठवले स्वप्निल लोणे निता यांचा समावेश करण्यात आला.