
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय कराळे
_________________________
परभणी : बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेली सुमारे दोन लाखांची रोकड घेऊन लंपास झालेल्या कामगारा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परभणी येथील स्टेशन रोड परिसरातील एका दुकानात काम करणारा कर्मचारी महेश राजू शिंदे यास दुकान मालक जगन्नाथ घोडके यांनी एक लाख ९३ हजार ५२० रुपयांची रोख रक्कम बॅंकेत भरणा करण्यासाठी दिली होती. परंतु त्याने ती रक्कम बॅंकेत न भरता घेऊन पोबारा केला. त्यामुळे घाबरलेल्या दुकान मालकाने ताबडतोब नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले.
दुकान मालक यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सदर कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तथापि या प्रकारामुळे परभणी शहरातील सर्वच दुकानदार मालकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. या खळबळजनक घटनेमुळे कामावर नेमकं कोणाला ठेवायचं याविषयीची साशंकता वाढीस लागली असून हाती आलेल्या पैशांमुळे कधी आणि कोणाची नीती कधी बिघडली जाईल याचाही थांगपत्ता लागण्याच्या पलिकडची अवस्था सध्या तरी परभणीत झाली आहे एवढं मात्र नक्की. या प्रकरणीचा तपास नवा मोंढा पोलीस करीत आहेत.