
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सात्विक प्रमाणिक बुद्धी असेल तर ती आपल्यासाठी सदैव हितकारक ठरत असते. म्हणून बुद्धी हि सदैव प्रमाणिकच असली पाहिजे. आणि चालाक बुद्धी हि विनाशकाले विपरीत बुद्धी , ठरत असते आणि क्षणार्धात होत्याच नव्हत करण्याची ताकद फक्त चालक बुद्धी मध्ये असते. म्हणून शक्यतो चालाकी हा प्रकार बुद्धी मध्ये प्रवेश नाही केला तर हि आपल्यासाठी आनंदाची व अंत्यंत लाभादायक बाब आहे . जीवनातील सगळं हित , अहित हे बुद्धी मुळे घडत असतं . म्हणुन शक्यतो बुद्धी हि सदैव सात्विक, सकारात्मक आणि प्रमाणिक असली पाहिजे .आपल्याला निसर्गाने नेमकं कशासाठी काय दिलं आहे .याचा योग्य वेळी योग्य बोध झाला तर मग मात्र जीवन अगदी सरळ साध सोप असतं . सृष्टीची उत्पत्ती आणि रचना याचा एकंदरीत विचार केला .तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव सजीव या ठिकाणी कार्यरत आहेत .या सगळ्या जीव सजीव प्राण्यांपैकी माणव हा प्राणी सगळ्यात जास्त बुद्धीवान आहे .मग सृष्टीच्या निर्मात्यांने मानवाला सगळ्यात जास्त बुद्धिमान शक्तिशाली बलाढ्य बनवले हे वास्तव जरी असलं तरी एवढी विशाल बुद्धी हि मग नेमकी निसर्गाने आपल्याला कशासाठी दिली आहे .याचा विचार मंथन आपण आयुष्यात कधी करतो का ? सृष्टीच्या निर्मात्यांने आपल्याला बुद्धी दिली हि फक्त चालाकी , फसवाफसवी,लबाडी , असत्य, वर्तन, असात्विक आचरण करण्यासाठी नक्कीच दिलेली नाही. तर आपल्याला सगळ्यात प्रभावी बुद्धिमान बनवलं हे , सदाचारी, सात्विकता , प्रामाणिकता, आयुष्भर टिकविण्यासाठी तसेच , सत्य व न्याय,निती धर्म संगत मार्ग वरून मार्गक्रमण करत अचारण करण्यासाठी तसेच सृष्टीच्या दृष्टीने हितकारक, कल्याणकारी दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी दिलेली आहे .याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली याची आठवण झाली पाहिजे.जेणेकरून आपलं पाऊल चुकणार नाही. तसेच आपल्या हातुन कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच चुकीचं कर्म होण कदापिही शक्य होणार नाही.आणि या पद्धतीने जर बुद्धी चा योग्य , सद उपयोग केला. तर आयुष्यभर कोणतीही अडचण संकटं दुःख आपल्यावर येणार नाही.आणि कदाचित कळत न कळत घडलेल्या कर्म कालानुसार संकटं दुःख आलही तरी त्याचा फार असा प्रभाव आपल्या वर होणार नाही . ज्यामुळे आपलं जीवन अस्थ वेस्थ होईल. सत्य प्रामाणिकता सचोटी याची ताकद शक्ती खुप मोठी प्रचंड प्रभावी असते. आत्म शक्ति जागृत करूनआत्मविश्वास वाढविण्यासाठी सहयभुत ठरणारी असते . सृष्टी वर जन्म घेतल्यानंतर कुणी कस आचरण कराव हा जरी ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय असला. तरी प्रत्येकाने शक्यतो सद मार्गाने आचरण करून सृष्टीच्या निर्मात्यांने आपल्याला दिलेली तीक्ष्ण , बुद्धी जनकल्याणासाठी समर्पित करून आयुष्य भर प्रामाणिकता जोपासण्या मध्ये आपलं फार काही अहित होईल असं वाटतं नाही . किंवा काही खास खुप मोठं नुकसान होईल असं तर अजिबात नाही. समजा आपल्या बुद्धीने अनेक असे नानाविध चालकी करणारे असत्य मार्गाने पराक्रम जरी केले.याची शेवटी फलनिष्पत्ती काय आणि बुद्धी चालाकीने काहीही मिळवलं तरी आपल्याला मानसिक समाधान आनंद मिळतो का ? तर खरं उत्तर नाहीच मिळत .पण खरं बोलण्याच धरीष्ठय आहे कोणाकडे तर खुप कमी आणि मोजक्या लोकांच्या जवळ हे धरीष्ठय नक्कीच आहे . म्हणून असत्य मार्गाने न्याय ,निती , धर्म मार्ग सोडून अनितीने बुद्धी प्रयोग करून चालकी करून सृष्टी वरील काहीही मिळवलं तर समाधान किती मिळेल हा प्रश्नच आहे.आणि ते अनितीने बुद्धी चालाकी मिळवलेल किती दिवस आपल्याला उपभोगण्यासाठी मिळेल मग ते पद असो वा वस्तू किंवा दगिना पैसा जे काही तत्सम पदार्थ असेल ते शेवटी मिळवण्याची पद्धत टिकण्याची हमी देत असते . म्हणून ते फार काळ टिकणार नाही . आणि नंतर दुःखाला समोर जावं लागतं. म्हणून अगदी विवेकाने सात्विकतेने, सत्याने, प्रामाणिकपणे आणि चालाकी न करता काहीही नाही मिळालं तरी समाधान आनंद मात्र मिळतो . यामध्ये काही शंका नाही. म्हणून आपल्याला दिलेली बुद्धी हि सद मार्गाने पराक्रम करून लोक कल्याण करण्यासाठी उपयोगी आली पाहिजे.हाच जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आणि आपली प्रामाणिकता सचोटी सात्विकता अधिक अधिक बळकट होऊन दिवसेंदिवस वृद्धिंगत झाली पाहिजे .तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला सृष्टीच्या निर्मात्यांने दिलेल्या बुद्धी चा योग्य आणि रास्त उपयोग होईल तसेच शक्यतो बुद्धीची हि प्रामाणिकता अंखड आणि आयुष्भर टिकली पाहिजे.व चालाकी पासून दुर राहिलं पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक
901163430