
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:कौठा ता. कंधार येथे कै मुक्ताबाई माधवराव देशमूख यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त मोफत रोगनिदान शिबीर दि. 11 सप्टेबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत मोफत त्वचारोग व दंतरोग तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थीतीत कै शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे नांदेड येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. सुनिल बापूराव देशमूख दंतरोग तज्ञ डॉ. वैभव हाणमंतराव पाटील दंतरोग तज्ञ डॉ. ऋतूजा हाणमंतराव पाटील यांच्या उपस्थितीत शिबिर होणार आहे अशी माहीती आयोजक देशमुख परीवार व समस्त गावकरी मंडळी यांनी सांगीतले व गावातील व परीसरातील सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले