
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
धुळे जिल्ह्यांतील न्याहळोद गावचे सुपुत्र जवान मनोहर पाटील ( वय ४२) यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाल्यांची माहिती धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन पत्रकार श्री.पुरीगोसावी यांना मिळाली. याबाबत धुळे पोलीस प्रशासनाकडूंन मिळालेल्या माहितीवरुन सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूत मध्ये कर्तव्य बजवत असताना तेथील हवामान दुष्परिणांमामुळे झालेल्या त्रासांने धुळे जिल्ह्यांतील न्याहळोद गावचे सुपुत्र मनोहर पाटील हे शहीद झाल्यांचे दुःखांत बातमी धुळे जिल्ह्यांवर येऊन ठेपल्यांने धुळे जिल्ह्यासह न्याहळोद गावावर ऐंन गणेशोत्सवांत शोककळा पसरली. मनोहर पाटील हे हवालदार या पदावर भारतीय सैन्य दलांत २००२ मध्ये भरती झाली होते. सियाचिन हा अत्यंत बर्फाळ प्रदेश आहे जगांतील सर्वात उंच युद्ध क्षेत्र असलेले व नेहमी तापमान ऑक्सिजनची कमी हा सर्व बर्फाच्छादिंत असा प्रदेश आहे. याच ठिकाणी कर्तव्य बजविणे म्हणजे शुत्रांपेक्षा नैसर्गिक वातावरणाचा सामना करणे जिगरीचे असल्यांने यालाच युद्ध क्षेत्रच म्हणता येईल. याच ठिकाणी धुळे जिल्ह्यांतील जवान जवान मनोहर पाटील कार्यरत होते.