
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप या गावी सोमवारी सकाळी फलटण मतदार संघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार दीपक जी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थिंतीत करंजखोप गावामधील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहांत संपन्न झाला. यावेळी बहुसंख्येने करंजखोप ग्रामस्थांसह परिसरांतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.आमदार दीपक जी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थिंतीत त्यांच्या प्रयत्नांतून करंजखोप या गावी अनेक विकासीशील मार्गी लागली. याच कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा पार पडला.आमदार दीपक जी चव्हाण यांच्या फंडातून व त्यांच्या कार्य प्रयत्नांतून करंजखोप गावच्या काही विकसित कामांना त्यांचे नेहमी सहकार्य असते. त्यांच्या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी काही कामांना तत्काळ मंजुरी देण्यांत आली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजखोप काही खोल्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरण इमारतीसाठी, तसेच शिवार रस्ते, विठ्ठल रुक्माई मंदिर दुरुस्ती तसेच कडूंजबाई मंदिर, तर पद्मावती जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणाकरता प्रत्येक एका विद्यार्थ्यास संगणक देण्यांचेही त्यांनी मंजुरी दिली. करंजखोप मधील झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार दीपक चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी आमदार दीपक चव्हाण यांचे करंजखोप ग्रामस्थ आणि उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यांत आले तसेच परिसरांतील राजकीय,सामाजिक शैक्षणिक उपस्थित मान्यवरांचेही करंजखोप ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यांत आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती फलटण मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण, कोरेगांव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संजय नाना साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश अण्णा धुमाळ, सोनके गावचे सरपंच संभाजी धुमाळ, तसेच करंजखोप गावचे सरपंच लालासो नेवसे, निर्वाचित उपसरपंच सौ. वैशाली ताई धुमाळ, यांच्यासह करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सेवक वर्ग, विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ तसेच करंजखोप गावांतील व परिसरांतील आजी-माजी मान्यवर ग्रामस्थ तसेच परिसरांतील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह मोठ्या ग्रामस्थ मंडळी संख्येने उपस्थिंत होते. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी करंजखोप गावचे सरपंच लालासो नेवसे यांनी प्रमुख उपस्थिंत असणारे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सर्वंच उपस्थित असणाऱ्या मान्यवर मंडळींचे आभार मानले.