
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधी-माणिक सुर्यवंशी.
आम्ही चालवू आमची शाळा या उपक्रमांतर्गत शिवशंकर विद्यालय वनाळीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचे प्रशासन चालवले.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व शाळात आम्ही चालवू आमची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा चालवावी असे निर्देश दिले होते.त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी दिग्रस कर सर प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे मॅडम यांच्या सूचनेनुसार देगलूर तालुक्यातील वनाळीच्या शाळेत स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वनंजे, विठ्ठल वाघमारे,माधव कदम,राजेशा बामणे,धनाजी मोरे पाटील,आनंद दिमलवाड,दिगंबर खिसे,कलाध्यापक बालाजी पेटेकर,बालाजी बारडवार,दिलीप पाटील आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचे प्रशासन चालवण्याची जबाबदारी घेतली आणि शाळेचे स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका म्हणून समीक्षा कोरेवार उपमुख्याध्यापिका धनश्री भाले या विद्यार्थ्यांनी काम पाहिले.यावेळी भक्ती हिप्परगे,प्रियंका बामणे, रोहिणी कहाळेकर,श्रध्दा दिवटे,निशा पठाण,तोफिक पठाण,मारोती भाले,माधव जुरावाड,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात श्रध्दा भिमलोड,दिपाली हिवराळे,भक्ती हिप्परगे,पूनम हिप्परगे,प्रतिक्षा वैष्णवी अंकमवार,निशा पठाण,सिमरन विद्या लोखंडे इशरत संतोष पाटील संजना पाटील,पुजा कदम माहेश्वरी पाटील,इरशाद,फरमान,साहिल विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अध्यापन कार्य करणाऱ्या स्वयंशासन दिनातील सहभागी शिक्षक शिक्षकांचे या ठिकाणी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी स्वयंशासन दिनातील अनुभव विद्यार्थ्यांनी विशद केले.कार्यक्रमाचे आभार धनश्री भाले हिने मानले.