
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जून महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना(एन एम एम एस) या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे ११ विध्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत
विद्यालयातील एकून ४७ विद्यार्थीनी ही परीक्षा दिली होती.
त्यापैकी२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून श्री संतोष रामराव कोलेवाड रा धसवाडी ता अहमदपूर जि लातूर यांची मुलगी स्नेहल कोलेवाड ही एक गरीब कुटुंबातील मुलगी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे या विध्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक प्रदीप कटके व एनएमएमएस विभाग प्रमुख त्रिंबक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशवंत विद्यार्थी व त्याचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सर देशमुख व संजय गुरव आदींनी अभिनंदन केले आहे .