
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई –कोरोना महासाथीचे संकट अजूनही पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे अजूनही भारतासह अनेक देशांमध्ये खबरदारी बाळगली जात आहे. अनेक ठिकाणी प्रवासादरम्यान किंवा इतर ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते.
अनेकांना कोरोना चाचणी करण्यास आवडत नाही. आता कोविड चाचणीच्या कटकटीत सुटका होण्याची शक्यता आहे. फक्त आवाजावरून तुम्हाला कोविडची बाधा झाली आहे का, हे समजणार आहे. यासाठी एक स्मार्टफोन अॅप विकसित करण्यात आले आहे.
स्मार्टफोन अॅपच्या तुमच्या आवाजाचे नमुना घेऊन तुम्हाला कोविडची बाधा झाली आहे की नाही, हे सांगणार आहे. ही कोविड चाचणी आर्टिफिशियस इंटेलिजेन्स म्हणजे ए आय च्या मदतीने होणार आहे.
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे अॅप अॅण्टीजेन चाचणीपेक्षा अधिक अचूक आहे. त्याशिवाय ही चाचणी अधिक स्वस्त दरात होईल. त्याचा वापरही अधिक सहजपणे केला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी PCR चाचणी करणे महाग आहे, अथवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे, अशा ठिकाणी हे अॅप मोठे फायदेशीर ठरणार आहे. चाचणीसाठी कमी वेळ लागणार असल्याने लोकांच्या वेळेची बचत होणार आहे.
नेदरलँड्समधील मधील इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सचे संशोधक यांनी सांगितले की, फाइन-ट्यून्ड ए आय अल्गोरिदमच्या मदतीने कोणाला कोविड झाला आहे, याची माहिती मिळू शकेल.
एका संशोधकानुसार, यामध्ये रिमोट आणि व्हर्च्युअल चाचणीदेखील केली जाऊ शकते. ही चाचणी करण्यासाठी एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. या अॅपद्वारे होणाऱ्या चाचणीचा वापर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वारावर केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.
कोरोना महासाथीच्या आजाराचा परिणाम लोकांच्या आवाजावरदेखील होतो. कोरोनाबाधित लोकांच्या आवाजात किंचित बदल होतो. त्यावरून संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्याला AI च्या मदतीने व्हॉइस अॅनालाइज करून कोरोना चाचणी करणारे अॅप तयार करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी संशोधक अॅनालिसिस तंत्राचा वापर करतात. यामुळे लाउडनेस, पॉवर आणि व्हेरिएशनमुळे आवाजातील बदल दिसून येतो. सध्या अॅपने केम्ब्रिज विद्यापीठातून ऑडिओ सॅम्पल जमा गेले आहेत.