
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:आज रोजी पो.ठाणे देगलुर हदीत प्रापर देगलुर शहरात श्री गणेशोत्सव २०२२ संबंधाने श्री गणेश विसर्जनाचे मुख्य मार्गाने पोलीस पथ संचलन घेण्यात आले सदर पथ संचलना दरम्यान संकट काळात डायल ११२ वर संपर्क साधने बाबत नागरीकांना अहवान करण्यात आले, मुले पळवुन नेण्या-या टोळया सर्कीय नाहीत याबाबत नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली तसेच आफवान वर विश्वास ठेवु नका व अफवा पसरवु नका असे अहवान करण्यात आले व तसेच श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डी. जे. चा वापर न करता प्रदुषण मुक्त मिरवणुक काढुन प्रशासनास सहकार्य करावे असे पो.स्टेच्या जीपचे पी.ए सिस्टम व्दारे नागरीकांना अहवान करण्यात आले आहे. सदर पथसंचलनात ०९ पोलीस आधिकारी, २० पोलीस आमलदार, १५ पी.टी.एस चे पोलीस प्रशिक्षणार्थी, ४२ होमगार्ड व एस. आर. पी. एफ हिंगोली ग्रुप १२ चे ०१ अधिकारी व १९ आमलदार असे हजर होते. पथ संचलन १३.१६ वा सुरु होउन १४.५६ वा संपविण्यात आला आहे.