
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
पुणे दि 08 सप्टें 2022
दलित नेते व प्रसिद्ध वकील एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांची वकिली रोखणाऱ्या तसेच 2 महिला वकिलांना अडवून त्यांचा मोबाईल हिसकावून घेणाऱ्या व फिर्यादीवरून गुन्हा दाखल करणाऱ्या , कोर्टाच्या आवारात पोलीस अधिकारी व उपस्थित सर्व पोलिस कर्मचारी कर्मचारीयांच्याविरोधात न्यायालयाने कायदेशीर कारवाई करावी. या मागणी करता पुणे शहरातील सर्व दलित व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले न्यायालयाच्या परिसरात आंबेडकरी कार्यकर्ते व नेत्यांनी गर्दी करू नये असे आव्हान आंबेडकरी पक्ष संघटना कृती समिती व दलित नेते एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांनी केल्यामुळे न्यायालयाच्या परिसरात लोकांनी गर्दी केली नाही परंतु, न्यायालयाच्या आजूबाजूच्या कामगार पुतळा, राजीव गांधी नगर, पुणे महानगरपालिका, संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन, पाटील इस्टेट, आदी. भागात शेकडो कार्यकर्ते थांबले होते.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पुणे जिल्हा सत्र न्यायालय तर्फे आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले त्यानुसार ज्येष्ठ नेते अशोक कांबळे, नागेश भोसले, राजेंद्र (आप्पा) गायकवाड, आदींच्या शिष्टमंडळाने ऍडिशनल सेशन जज श्रीयुत नवंदर साहेब, झेंडे सर व अश्टुरकर सर यांचे भेट घेतली व न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाने न्यायालयाच्या आवारात झालेल्या कथित अत्याचाराचे गंभीर दखल घ्यावी व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन दिले .
जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश श्रीयुत नावंदर साहेबांनी प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले व आंबेडकरी जनतेने जो संयम दाखवला त्याचे कौतुक केले. यावेळी न्यायालय परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अद्यापही पुणे पोलिसांनी एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांची तसेच दोन महिला वकिलांची फिर्याद नोंदवून घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी व कायद्याच्या सन्मानासाठी आंबेडकरी जनता पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल असा ठाम निर्धार सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या प्रतिनिधींनी जाहीर केला .
यावेळेस मान्यवरांची उपस्थिती वसंत दादा साळवे , अँड. किरण कदम, राहुल डंबाळे, अनिल अवसरमल, ओमकार कांबळे, बाळासाहेब बनसोडे, हरीभाऊ वाडमारे, तुषार गायकवाड, सिद्धांत सूर्वे, अभिजीत बनसोडे, जयदीप सकट , आरती बाराते, राकेश सोनवणे, अनिल जावळे, कालींदा कसबे, रुबीना शेख, रमेश कोल्हे, परशुराम शेवंगे, युसूफ भाई, रितेश गायकवाड, स्वप्निल वाघमारे, निलेश गायकवाड, प्रसाद (बंटी) शेलार, विनोद चव्हाण, शुभम भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते .