
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सगळ्यात बुद्धिमान मार्ग म्हणजे सगळ्यात एकरूप होणे.सगळ्या सोबत एकरूप असणे सतत योगात असणे .देवांचे दैव कैलासपती महादेव व जगद माता पार्वती यांचे पुत्र जगद वंदय दैवत गणपती बाप्पा . संकष्ट चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा आनंद महोत्सव आणि जल्लोषात अगदी गावा गावात घरा घरात जितके तिकडे चोहीकडे गणपती बाप्पा कुठंही पाहा धुमधाम फक्त गणपती बाप्पांची.आणि वातावरण तर काय आनंदाने नाहुन निघालय .हया आनंदाला आपण वर्षभर पोरके होणार या चिंतेने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाला निरोप देण्याचा ताण तणाव आणि आनंद हा संगम विलक्षण पाहणयासारखा . बाप्पाच अगमान झालं आनंद झाला .या आनंदाच्या वातावरणात आता निरोपाची वेळ समिप आली आहे .मनोमन वाटतंय बप्पा आपण जाऊ नका पण परंपरे नुसार उत्साह पुर्ण वातावरणात निरोपासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. तयारी अगदी अंतिम टप्प्यात आहे. श्री.गणेश, गणपती, विघ्नहर्ता अशा अनेक नावाने ज्या गणपतीचे आपण स्मरण करतो . आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव सर्व गणेशभक्त मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. गणपती बाप्पा यांचं महत्व आणि महती खुप महान आहे .श्री गणेशाला प्रत्येक पुजेमध्ये अग्रपुजेचा मान का मिळाला? कोण आहे श्री.गणेश, प्रत्येक गावात एक तरी गणपतीचे मंदिर असतेच, कोणताही माणुस दिवसाची सुरुवात गणपतीचे दर्शन करुन का करतो .या मध्ये आपल्या धर्मशास्त्रा नुसार गणपती बाप्पा हे माता पार्वतीने स्वतःच्या मळापासून तयार केलेला पार्वतीपुत्र. ज्यानी स्वतःची आई पार्वती ही स्नान करत आहे तीचे स्नान होईपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. या करिता महादेवाचे सोबती, नंदी आणि इतकेच नाही तर खुद्द महादेव यांना देखील पराभूत केले होते .परंतू शेवटी भगवान शंकर यांनी क्रोरधित होऊन त्रिशुळाने श्रीगणेशाचा शिरच्छेद केल्यानंतर हि वार्ता माता पार्वतीला समजली तेंव्हा माता पार्वतीने भगवान शंकर यांच्या कडे हट्ट केला .कि श्री गणेशाला पुन्हा सजीव करा त्यावेळी भगवान शंकर आपल्या ञिशुळाने हत्तीचे मस्तक शिरच्छेद करून श्रीगणेशाला लावले. व श्रीगणेशाचा गजवक्र गणपती झाले.
यानंतर पुढे चालत सर्व देवतांची स्पर्धा लागली होती ती पृथ्वीप्रदक्षणा करण्याची त्यावेळी गणपतीने ही स्पर्धा पार्वतीला प्रदक्षणा करुन जिंकली व सिद्ध केले की पार्वती म्हणजे आपली आई हीच आपली माता तिची प्रदक्षणा केली. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा घडली. त्यावेळी सगळ्या देवांनी गणेशाला म्हटले की गणेशा माग काय मागतोस ते तेंव्हा गणेशाने मागितले की कोणत्याही पुजेला मला सर्वात आधी मान दिला जावा म्हणून कोणत्याही पुजेची सुरुवात श्री.गणेशाय नमः अशा मंत्रोच्चराने होते.
गणपती हा विघ्नहर्ता मानल्या जातो. कारण भक्तांना त्याच्या भक्तीचा प्रत्यय फार लवकर आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक गावी गणेशाचे एक तरी मंदिर आहे. कोणताही व्यक्ती कामाची सुरुवात ही गणपतीचे दर्शन करुन करत असतो.
गणपती बप्पा हे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे विद्या आणि धन या दोघांचाही भाऊ आहे. गणपतीचा जो भक्त म्हंटला गेला त्याजवळ धन आणि बुद्धी दोन्हीचाही संयम राखल्या जातो. त्यामुळे गणेशाची उपासना कधीच व्यर्थ जात नाही. आपल्या धर्म शास्त्रानुसार गणेशाचं महत्व अनन्यसाधारण आहे. गणपतीला, गणपती, श्रीगणेश या प्रसिद्ध दोन नावांशिवाय अन्य अशी 106 नावे आहेत . त्यामध्ये लंबोदर, महाबल, महागणपति, महेश्वर, मंगलमूर्ति, गजकर्ण, गजानन, गजवक्र, गणाध्यक्ष, गणपती ,गौरीसुत – लंबकर्ण ,विघ्नराज, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशाय , विघ्नेश्वर , विकट, धार्मिक , दूर्जा, द्वैमातुर, एकदंष्ट्र, ईशानपुत्र, गदाधर, कपिल, कवीश, श्वेता , सिद्धिप्रिय, स्कंदपूर्वज , भालचन्द्र, बुद्धिनाथ, धूम्रवर्ण, एकाक्षर, एकदंत, मूषकवाहन, बालगणपति, बुद्धिप्रिय, बुद्धिविधाता, चतुर्भुज, देवदेव, देवांतकनाशकारी, गणाध्यक्षिण, गुणिन, हरिद्र, हेरंब,निदीश्वरम ,
प्रथमेश्वर, शूपकर्ण, शुभम , सिद्धिदाता, मूढ़ाकरम, मुक्तिदायी, नादप्रतिष्ठित, नमस्तेतु, उमापुत्र,
वरगणपति, वरप्रद, वरदविनायक, वीरगणपति, विद्यावारिधि, विघ्नहर, विघ्नहर्ता, विनायक ,
विश्वमुख, यज्ञकाय, यशस्कर, यशस्विन, योगाधिप, सिद्धिविनायक , सुरेश्वरम ,वक्रतुंड, अखूरथ
अलंपत, अमित, अनंतचिदरुपम, अवनीश,अविघ्न ,भीम, भूपति , भुवनपति, देवव्रत, देवेन्द्राशिक
, विघ्नविनाशन, सुमुख ,स्वरुप ,तरुण ,उद्दण्ड ,कीर्ति ,कृपाकर ,कृष्णपिंगाक्ष, क्षेमंकरी, क्षिप्रा , मनोमय, मृत्युंजय, नंदन,पाषिण,पीतांबर, प्रमोद, पुरुष, रक्त, रुद्रप्रिय, सर्वदेवात्मन, सर्वसिद्धांत , सर्वात्मन, शांभवी, शशिवर्णम, शुभगुणकानन.
ही सर्व नावे आपल्या लाडक्या गणरायाची आहे.
यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः।
यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः॥
हा मंत्र गणेशाचे नामस्मरणः करण्यासाठी सातत्याने जपला जातो.
दरवर्षी गणपतीचा उत्सव आपण सगळ्यांना लळा लावून जातो. सध्या सर्वत्र गणेशोत्सव चालू आहे .आनंदाची सगळी कडे धामधूम सुरू आहे . आणि या सगळ्यात आता गणपती बाप्पा यांना पुढील वर्षाच्या निमंत्रणासह निरोपासाठी भक्तगण सज्ज आहेत . आणि प्रत्येक जण निरोप समारंभाच्या आनंदात तलिन होण्यासाठी आतुर आहे . आणि सगळीकडे एकच धामधुम आहे . गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आणि अशा आकाश भेदी गर्जना देत भक्त बाप्पांना निरोप देतात .गणेशाच्या सर्वभक्तगणांना अनंत चतुदर्शीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व
लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301