
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अनियंत्रित बळ किती ही असलं तरी ते युद्ध घडवू शकत . अनर्थ घडवू शकत.पण नुसत्या बळावर विजय यश मिळेलच असं नाही.
बळ आणि बुद्धी यांचा संगम अपवादात्मक परिस्थितीत एकत्र आढळून येतो . बहुतांश लोकांचा विश्वास हा आपल्या बळावर असतो . कारण बळ हे लढायला शिकवते .पण अनेक वेळा अनेक ठिकाणी शक्ति पेक्षा युक्ति बुद्धी हि उपयोगी पडते . आणि पराभवाला अपयशाला यशात परिवर्तित करते .कारण बुद्धी हि जिंकायला शिकवते .आपण इतिहासाचा मागोवा घेतला .तर याची चुणूक आपल्याला अनेक प्रसंगी पाह्यला मिळते . अनेक धार्मिक पौराणिक ग्रंथात सुद्धा आपण लक्ष पुर्वक निरीक्षण केले. तर शरते शेवटी बुद्धी हि सरस प्रबळ ठरते .याचा अर्थ असा होत नाही कि आपण बलवान नसलं पाहिजे .आणि फक्त बुद्धीवान असलं पाहिजे.अस मुळीच नाही .आपण बलवान असलच पाहिजे .पण आपल्या बळावर बुद्धी च नियंत्रण असलं पाहिजे.आपला विश्वास हा बळा पेक्षा जास्त बुद्धी वर असला पाहिजे. नुसतं बळ हे लढ्याला शिकवत असल्याने अनेक ठिकाणी बळाचा वापर झाला .पण बुद्धी हि विजयाची शिल्पकार असल्याने नुसत्या बळाला बुद्धी ने परास्त करून धुळ चारली हा ईतिहास आहे. म्हणून जीवनात बळाच्या भरोशावर जास्त बिसंबुन न राहता बुद्धी बळावर वर जास्त विश्वास ठेवला पाहिजे.कारण बुद्धी हि विजयाची शिल्पकार असते. सृष्टी वरील कोणत्याही विषयात कोणत्याही क्षेत्रात बळ शक्ति ताकद हि आवश्यक बाब आहे . कारण बळ लढायला शिकवते .पण त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे बुद्धी हि आहे. कारण बुद्धी जिंकायला शिकवते . आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाच्या युद्धात कोणतं बळ वापरायचं हे आपल्यावर अवलंबून असतं .पण जो बळा बरोबर बुद्धी वापरतो .तो विजयला सलामी देतो . किंवा जो बळा ऐवजी बुद्धी वापरतो .तो सुद्धा विजयाला गवसणी घातल्याशिवाय रहात नाही. म्हणून आपल्या जीवनात बळापेक्षा बुद्धी हि सरस किंवा उत्तम फलदायी ठरते .जीवनातील एखादया प्रसंगात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रसंगांत आपल्या बाजूने कोण आहे ? विरोधात कोण आहे? किंवा आपल्या बाजूने आपल्या जवळ बळ किती आहे .आपण किती बलवान शक्तिशाली आहेत. किंवा किती बळ विरहित आहेत .याला फार महत्त्व नक्कीच नाही .या सगळ्यात आपल्या कडे बुद्धी बळ किती आहे .यावर सगळं गणित बदलत असतं. व बुद्धी बळ हे सगळ्या प्रकारच्या बळावर वरचढ ठरते. भारी पडते श्रेष्ठ ठरते . म्हणून कोणताही विषय असो वा समस्या , अडचण संकटं असो या मध्ये आपण आपल्या बळावर ताकदीने, शक्ति ने समोरे गेल्यानंतर विजय मिळेल कि नाही याची खात्री कोणीही देवु शकणार नाही .या उलट बुद्धी बळावर समोर गेल्यानंतर विजय यश हे निश्चित मिळणार या मध्ये यत्किंचितही किंतु परंतु नाही.यश अपयश जिंकण हारण या मध्ये योग्य रणनिती खुप महत्वपूर्ण ठरते . ज्याची रणनिती योग्य तो जिंकतो यशस्वी होतो .पण रणनिती हि बळा पेक्षा बुध्दी वर जास्त अवलंबून असते . म्हणून युद्धात असो किंवा जीवनातील छोट्या छोट्या विषयात यश अपयशात आपल्याला बळापेक्षा बुद्धी हि नक्कीच उत्तम पद्धतीने कामी येते .म्हणून आपल्या कडे असणार बळ ताकद शक्ती आपल्याला लढायला शिकवते .या मध्ये दुमत नाही.पण आपल्याकडे असणारी बुद्धी हि जिंकायला शिकवते .मग लढ्याला शिकवणे उत्तम कि जिंकायला शिकवणे उत्तम तर अंतिमतः जिंकायला महत्व असल्याने जिंकायला शिकवणे हे कधीही उत्तमच. आणि ज्याच्या कडे बळ आणि बुद्धी दोन्ही आहे .तो महा भाग्यवान आहे .जीवनात शक्ति हि आवश्यक बाब आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आपली शक्ती बळ हे वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो . आणि असल पाहिजे . पण नुसतं बळ वाढवुन चालेल का तर नक्कीच नाही चालणार त्यासाठी बुद्धी बळ पण खूप आवश्यक आहे . कारण शक्ति पेक्षा पेक्षा युक्ति अधिक सरस ठरते . यशस्वी ठरते. आपल्या कडे किती बळ आहे. आपण किती बलाढ्य आहेत .यावर आपला विजय पराजय ठरत नाही.तर आपला विजय हा आपल्या युक्तिवर बुद्धी वर अवलंबून असतो . म्हणून शक्ति पेक्षा युक्ति ला जास्त महत्त्व आहे प्राधान्य आहे.आणि आपण आपली शक्ति वाढवून बलाढ्य होण्यापेक्षा बुद्धी वापरून विजयी होण कधीही उत्तमच असतं.महणुन जीवनातील कोणताही संग्राम असु द्या बुद्धी बळ हे असं बळ आहे कि ते पराजयाला विजयात , अपयशाला ,यशात ,अज्ञानाला ,ज्ञानात ,वाट चुकलेल्याला योग्य मार्गावर आण्याच अशक्य प्रायः कार्य शक्य करत . म्हणून नुसत्या बळावर विसंबून न राहता बुद्धी बळावर मार्गक्रमण केल तर आपला पाडाव कोणीही करू शकत नाही.याला इतिहास साक्षी आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301