
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
राज्याच्या विविध भागातपावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आजही हवामान विभागानं राज्यात पावासाचा इशारा दिला आहे.आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मराठवाड्यात देखील पावसानं दाणादाण उडवली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग वाढवण्यात आला असल्यामुळे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून सध्या 76 हजार 556 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तर धरणाचे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा निसर्गही वाढवण्यात आला आहे.
जायकवाडी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणात सद्या 65 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर उजव्या कालव्यातून 500 क्यूसेक आणि डाव्या कालव्यातून 600 क्यूसेक एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोबतच मुख्य 18 दरवाज्यातून 75 हजार 456 क्यूसेक जायकवाडी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणात सद्या 65 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर उजव्या कालव्यातून 500 क्यूसेक आणि डाव्या कालव्यातून 600 क्यूसेक एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोबतच मुख्य 18 दरवाज्यातून 75 हजार 456 क्यूसेक एवढ्या वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला जायकवाडी धरणातून एकूण 76 हजार 556 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
वरील धरणातून पाण्याची आवक वाढताच जायकवाडी’ धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने गोदावरी तुडुंब भरली असून, पुराचे पाणी बीड, जालना, नांदेडच्या दिशेने वेगाने झेप घेत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील खालच्या जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कुणीही नदी पात्रात उतरू नयेत असा इशारा देण्यात आला आहे.
सद्याची परिस्थिती पूर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट, सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.78 फुट,जिवंत पाणी साठा (Live) : 2144.665 दलघमी, (75.73 टिएमसी) एकुण पाणी साठा (Gross) : 2882.771,दलघमी (101.89 टिएमसी), पाण्याची आवक (Inflow): 65 हजार 013,क्युसेक्स पाण्याचा विसर्ग (Discharge) : 75 हजार 556 ,क्युसेक्स एकूण उघडलेले द्वार : 18 ( द्वार क्रमांक 10 ते 27 )