
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कंधार च्या वतीने दि.११-०९-२०२२ रोजी रविवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार लोहा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. श्यामसुंदर शिंदे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. तुषार राठोड यांची उपस्थिती लाभणार आहे. _कार्यक्रम दि. ११-०९-२०२२ वेळ – ११:०० वाजता स्थळ- कै.वसंतराव नाईक सभागृह (बचत भवन) पंचायत समिती कंधार येथे होणार आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नम्र आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कंधार तर्फे करण्यात येत आहे.