
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता.देगलुर येथील येथील कलाध्यापक बालाजी पेटेकर यांचा हरहुन्नरीु मुलगा ओमकार बालाजीराव पेटेकर हा बुद्धिबळ स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवून आणखी एक मानाचा तुरा खोवला.सर जे.जे.वैद्यकीय महाविद्यालय मुंबई च्या आयोजित बुध्दिबळ स्पर्धेत त्याने अव्वल येण्याची किमया केली.पूर्वीही ओमकार पेटेकर यांनी बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची चमक दाखवत अनेक स्पर्धेमध्ये देदीप्यमान यश मिळवले.त्याने तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय वर तीन वेळेस प्रथम आला तर विभागीय स्पर्धेत दोन वेळेस प्रथम आला होता.परवाच कोल्हापुर येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या बुध्दिमतेच्या कर्तुत्वाची झलक दाखवत 180 स्पर्धकातुन 5 वे स्थान मिळवले होते.जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जे.जे.हॉस्पिटल मुंबई च्या वतिने व खतगाव परिसरातील मित्र परिवार व हीतचिंतकातुन या यशाबद्दल कौतुकासह अभिनंदन होत आहे.