
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
….शनिवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने संपर्क तुटला. सुगाव निपाणी सावरगाव मनसकरगा खानापूर एमआयडीसी परिसरातून वाहून येणारे पाणी लखा येथील पुलावरून जात असल्याचे कळताच संपर्क तुटलेल्या लखा गावाला प्रभारी तहसीलदार पंगे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल दाखल झाले होते. दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत आहेत. तर मन्याड नदीने रुद्ररूप धारण केले आहे. कोणीही पाण्यात उतरू नये. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रभारी तहसीलदार पंगे यांनी केले आहे . यावेळी मंडळ अधिकारी बी.एम. पुष्पलवार, धर्मेकर,ग्रामसेवक राजेश्वर नुचे हजर होते.