
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर– भारतीय टपाल विभागातर्फे विविध योजनांची माहिती देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी सभागृह शहापूर येथे महामेळावा आयोजित केला होता.
जसे सुकन्या समृद्धि योजना, बचत खाते,RD,IPPB खाते ,टपाल जीवन विमा ,ग्रामीण टपाल जीवन विमा,आधार कार्ड ला मोबाइल नंबर जोडणे, अशा विविध योजनांची माहिती मान्यवरांच्या वतीने देण्यात आली. या महामेळाव्यासाठी बोटलावार सर ए. एस.पी. औरंगाबाद, डाकअधिक्षक नांदेड राजीव पाळेकर , भागवत मुंडे डाक निरीक्षक देगलूर, मामीडवार ए. एस.पी.नांदेड, विनोद शेट्टी अण्णा, जामनोर मेलवरसल,देगलूर निळकंठ कल्पे एस.पी.एम. शहापूर , मिलिंद देऊळकर एसपीएम सगरोळी, शिंदे एसपीएम बिलोली, तानाजी शिंदे एस. पी एम शंकरनगर,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणेश माळपत्ते सरपंच, शिवाजी सायना कनकंटे,माजी जिल्हा परिषद सदस्य, मलनरेड्डी चिंतलवार, राजेंद्र दंडोल, मलरेड्डी यालावार उपसरपंच, जगदीश चिंतलवार, गंगारेड्डी कोडगिरे, जयपाल कांबळे, पत्रकार शेख वसीम, जावेद अहमद, नरसिंगराव गोविंदराव पाटील, गणेश चामावार, विश्वंभर पाटील, डाक सेवक संघटनेचे सचिव काळे, बीपीएम जाकीर देसाई, अब्दुल रहीम पाशा पटेल, राजकुमार चोपडे, बालाजी जाजनुरे, देगलूर उपभागीय डाक घराचे सर्व बीपीएम,एबीपीएम कर्मचारी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.