
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील पाताळगंगा या गावात पुर्वी पासुनच एक गाव एक गणपती बसवण्याची प्रथा आहे.गणेश उत्स म्हटलं की,गुलाल ,डिजे हा विषय येणारच.गावात तशी शांतता आहे परंतु राजकीय दोन गट असल्याने या गावातच दोन समाजात तेढ निर्माण झालेला असायचा.यातच बालाजी चुकुलवाड हे फौजेमधुन सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांनी भ्रष्टाचार मुक्त कंधार व पैसे दारु विना निवडणुका झाल्या पाहिजे या उदेशाने काम करत असल्याने आपल्या गावातुनच याःची सुरवात झाली पाहिजे या उदेशाने दोन्ही गटाला एकत्र आणुन गावात गुलाल डिजे व दारु मुक्त गाणेश उत्सव करण्याचा निर्णय घेतला .या निर्णयाला गावातील सर्वच नागारीकांनी पाठिंबा देवुन मोठ्या उत्सहाने दहा दिवस सामाजिक उपक्रम राबवुन दहाव्या दिवशी बाप्पाला निरोप दिला.
दोन वर्ष कोरोना व्हायरचा प्रदुर्भाव असल्यामुळे गणेश उत्सव व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध होते.कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला असल्याने सर्व निर्बंध उठवले आहेत .यावर्षीचा गणेश उत्सव मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला.गणपती स्थापनेच्या दिवशी प्रशासनाच्या वतिने बैठक घेऊन गुलालमुक्त गाणेश उत्सव साजरा करण्याच्या सुचना दिल्या होत्या.यावर अनेक मंडळानी या आदेशाचे पालन करुन गुलालमुक्त गाणेश उत्सव साजरा केला. तालुक्यातील पातळगंगा या गावात गेल्या अनेक वर्षापासुन एक गाव एक गणपती बसवण्याची प्रथा आहे …बालाजी चुक्कलवाड हे सामाजिक काम करत असल्याने पहिल्यांदा आपले गाव सुधारले पाहीजे या उदेशाने त्यांनी गावऱ्यांची बैठक बैलवुन गणपती विषयी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले.यापुढे गावात जात पात व राजकीय डावपेच चालणार नसुन गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करायचे असल्याचा निर्णय घेतला यावर सर्वांनी चुक्कलवाड यांना भरभारुन प्रतिसाद दिला.गणपती स्थापनेपासुन सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.दारु मुक्ती,हुंडाबाळी,पैसे मुक्त मतदान या संदर्भात पथनाट्य सादर करुन नागारीकांमध्ये परिवर्तन घडवुन आणाले.
गणपती विरसर्जनाच्या दिवशी गाणापती बाप्पाची गावभर मिरणुक काढण्यात आली.गुलाला ओवजी पुष्पवृष्टी करुन ढोल ताशाच्या व भजनाचा गजर करत बाप्पाला निरोप दिला.बाप्पाच्या मिरणुकीत वृध्द पुरुष महीला यांनी ही फुगड्या खेळुन नागरीकांना प्रसन्न केले.विशेष म्हणजे गावातील एकाही नागरीकांनी दारु घेतली नव्हतो.या गणपती उत्सहाच्या माध्यमातुन गावकऱ्यांमध्ये चांगलेच परिवर्तन झाले असुन निवडणुकीत ही पैसा, मटन, दारु हे गावात चालणार नाही.ज्या व्यक्तीला मतदान करायच आहे त्या व्यक्तीला लोकशाही मार्गाने मतदान करा परंतु गावात राजकीय डावपेच यापुढे चालणार नसल्याचा संकल्प गावकऱ्यांनी केल्याची माहीती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.
हा गणेश उत्सव गुलाल डिजे व दारु मुक्त करण्यासाठी अध्यक्ष नवनाथ आईतवाड ,सचिव मारुती गंगनपाड,उपाध्यक्ष कृष्णा मुंडे, कोषाध्यक्ष धोंडीबा मुंडे ,सहसचिव राहुल मुंडे ,व्यवस्थापक विठ्ठल चुक्कलवाड, उप व्यवस्थापक व्यंकटी मुंडे संघटक प्रविन गिनलवाड ,सहसंघटक बाबू जक्कलवाड , दत्ता पंढरी मुंडे, नामदेव मुंडे,एकनाथ मुंडे, संतोष चुकलवाड, बापुराव मुंडे, राजीव मुंडे,ओम मुंडे, तुकाराम गंगणपाड, तुकाराम मुंडे, अनिल कोंडे, धोंडीबा आरसुलवाड,व गावकरी मंडळी सहकार्य केले.