
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम चिंतलवाड
–शहर अतिशय शांतप्रिय शहर म्हणूनओळखले जात आसताना काही दिवसात या ठिकाणी वेगळेच स्वरूप पाहताना दिसुन येते आहे.दि.०८सप्टेबर२०२२रोजी शहरातील लकडोबा चौक येथील रहिवासी नामे पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड वय ३५वर्ष या युवकांचा मौजे वाशीच्यां माळात दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.कुंटुबातील कर्तापुरुष गेल्याने तोटेवाड कुंटुंबावार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.हिमायतनगर शहर अतिशय संवेदनशील बनत चालले आसतांना, गुन्हेगारीवर योग्य वेळी कसा?आवर घालता येईल,यांचे एक मोठे आव्हान पोलिस निरीक्षक बी.डी.भूसनुर यांच्या पुढे उभे टाकलेआहे.शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाणही दिवसेंदिवसवाढतचआहे.जनसामान्यातं कायद्यांची भिती राहिली नाही काय?अशी ही चर्चा आता सुरू झालीआहे.पोलिसा प्रती जनमाणसातील धाक कमी होताना दिसून येत आहे.
सदरील घटनेच्या आरोपी विरूध्द भादंवी ३०२/३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआलाआहे.नामे परमेश्वर आकलवाड,रामेश्वर आकलवाड,लक्ष्मन आकलवाड,व लक्ष्मीबाई आकलवाड आसे एकून चारआरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरील घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बी.डी.भूसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस साहाय्यक निरिक्षक बालाजी महाजन हे अधिकचा तपास करीतआहेत.ही घटना कोणत्या कारणाने घडली आहे.याचा संपूर्ण तपास पुर्णपणे झाल्यावरचं कळणार आहे.