
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काळगव्हान येथे अंगणवाडी केंद्र क्र.२८ व ११० चे तसेच माहे.पोषण आहार अभियान अंतर्गत पोषण आहार व महिलांचे आरोग्य या संबंधित विषयांवर दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित महिलांची बैठक यावेळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काळगव्हान येथे पार पडली.यावेळी अंगणवाडी सेविका सौ.कुटे,सौ.हागोणे,सौ.निचळ यांनी गर्भवती माता,स्तनदा माता व युवती यांना चौरस आहाराचे महत्त्व लक्षात आणून दिले व कार्यक्रमा अंती सौ.रामटेके यांनी माता-भगिनी व युवती यांचे आरोग्य समस्या व प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा दरम्यान सरपंच श्री.ज्ञानदेवराव ढवळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियोजन समितीवर अंजनगाव सुर्जी तालुक्यामधून निवड करण्यात आली तसेच सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंजनगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती व आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या सरपंच सेवा संघाकडून सर्वोकृष्ट सरपंच म्हणून गौरव करण्यात आला त्याबद्दल सदर उपस्थित महिलांनी या आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून काळगव्हान ग्रा.पं.चे सरपंच श्री.ज्ञानदेवराव ढवळे यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.श्री.सोळंके,सरपंच श्री.ज्ञानदेवराव ढवळे,सौ.रामटेके(महिला आरोग्य मार्गदर्शक),सौ.थोरात(पर्यवेक्षिका),अंगणवाडी सेविका सौ.कुटे, सौ.हागोणे,सौ.संगीता निचळ(आशावर्कर),सौ.रायबोले(मदतनिस),सौ.खेकडे,शिवानी निचळ आदी मोठया प्रमाणावर महिला-भगिनी उपस्थित होत्या.
डॉ.सोळंके यावेळी काय म्हणाले
शासनाने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सुरू केले असून त्या कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांसाठी गरोदरपणात घ्यावयाचा सकस व पौष्टिक आहार भेंडी,कारले,कोबी,लिंबू,टोमॅटो,बटाटे,हिरवी मिरची (प्रमाणशीर सेवन),कांदा,कढीपत्ता,भोपळा,विविध फळे,मोड आलेले कडधान्य सेवन केल्यास त्यापासून मिळणारे जीवनसत्व,गर्भवती महिला व होणाऱ्या बालकास किती महत्त्वाचे आहे.याविषयी आशा वर्कर,महिला,व युवतींना यावेळी मार्गदर्शनपर माहिती दिली.
सरपंच श्री.ज्ञानदेवराव ढवळे कार्यक्रमादरम्यान म्हणाले
महिला भगिनींना पोषण आहार महत्वाचा असून तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला पाहिजे.गर्भवती महिलांनी तर नियोजित वेळेवर आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळणारे पालेभाज्या,फळ-फळावर सेवन करायला पाहिजे व डॉक्टरांचे वेळोवेळी मार्गदर्शन उपचार घेऊन औषधोपचार केला पाहिजे असे म्हटले.