
दैनिक चालु वार्ता किनवट / (जि.नांदेड)
या घटनेमुळे नांदेड जिल्हा चांगला हादरला. किनवट(जि.नांदेड) दाढी करण्यासाठी सलून मध्ये गेलेल्या तरुणाची चांगलाच वाद विकोपाला गेल्यांने सलून चालकांने वस्तऱ्याच्या धारदार शस्त्रांने ग्राहकांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये तरुण ग्राहक मृत्युमुखी पडला या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावांने सलून चालकाला बेदम मारहाण करीत ठार केले. ही खळबळजनक घटना गुरुवारी बोधडी बुद्रुक ता.किनवट येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नांदेड जिल्हा चांगलाच हादरला. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन बोधडी बुद्रुक येथील व्यंकटी सुरेश देवकर(वय२२) हा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्यांच्या सुमारांस हेअर सलून मध्ये दाढी करण्यासाठी गेला होता तेव्हा काही कारणावरुन दोघांचा वाद चांगलाच विकोपाला गेला यातून अनिल शिंदे यांनी दाढी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार वस्तऱ्यांने व्यंकटी देवकर यांच्या गळ्यावर गंभीर वार केले व तो पसार झाला होता गंभीर जखमी झालेला व्यंकटी देवकर यांने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याला रुमाल धरुन तेथून लगेच निघाला आणि ५० फूट चालत जावुन खाली कोसळला अतिरक्तस्रांव झाल्यांने त्याचा जागीच मृत्यू झाला. या खुनानंतर संतप्त अज्ञांत जमावांने सलून चे दुकान व संबंधित सलून मालकांचे घर जाळून खाक केले. सदर घटना नांदेड जिल्ह्यांतील किनवट तालुक्यांतील बोधडी येथील भर बाजारपेठेमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारांस घडली संतप्त जमावांने आरोपीला ही ठार मारले.