
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
औरंगाबाद पिशोर गावचे सुपुत्र शहीद जवान सुनील दादाराव जाधव (वय ३३) यांचे कर्तव्यावर असताना हृदयविकारांच्या झटक्यांने पुणे येथे निधंन झाले. ते पुणे येथे हवलदार या पदावर कार्यरत होते त्यांच्या निधनांची बातमी समजताच त्यांचे नातेवाईकांनी संपूर्ण पिशोर गाव हे शोकसागरांत बुडाले. शहीद जवान सुनील जाधव यांना आज दुपारी शासकीय अखेरची मानवंदना देण्यांत येणार आहे सुनील जाधव यांच्या पश्चांत आई,पत्नी ,मुलगा दोन भाऊ व भावजय असा त्यांचा परिवार होता. पिंशोर येथील सुनिल दादाराव जाधव हे भारतीय सैन्य दलामध्ये ऑक्टोबर २००८ भरती झाले होते. लष्करात बाँबे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर (पुणे) येथे ते कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत असताना सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी पिंशोर येथून कोळंली रोडवरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यांत येणार आहेत. शहीद जवान सुनील जाधव यांनी अनेक ठिकाणी देशाच्या संरक्षणाची उत्कृंष्ट कामगिरी पार पाडली होती. गेल्या अडीच वर्षापासून ते पुण्यांत ड्युटीवर होते. मनमिळावू स्वभावांच्या जवानांचा इतक्या कमी वयातमध्ये निधन झाल्यांने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.