
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल झाल्यामुळे व्हायरस इन्फेक्शना बरोबरच किटक जन्य आजाराने डोकेवर काढले असल्यामुळे लोहा न.पा. च्या वतीने शहरात धूर फवारणी ,अंबेटीग, गप्पी माशांचा वापर करून डासांचा नायनाट करण्यात येत तेव्हा नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा व न.पा. कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे.
मच्छर व डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू, चिकन गोनिया , हिवताप, मलेरिया हे आजार होऊ शकतात तेव्हा सार्वजनिक ठिकाणी मच्छर व डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी लोहा न.पा सर्वोतरी खबरदारी घेत आहे. लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, अभियंता चौडेकर, नळगे, राजकौर,दाढेल, धुतमल,आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.