
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभाग सरचिटणीस म्हणून
युवा कवी लेखक दत्तात्रय खुळे यांची अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे
राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी एका पत्रकान्वये नुकतीच नियुक्ती केली आहे
दत्तात्रय खुळे हे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य क्षेत्रात व साहित्य संघटनेने मध्ये सक्रियपणे
काम करीत आहेत . त्यांनी विविध पदावर राहून साहित्य विश्वात आपला आगळा वेगळा ठसा
उमटविला आहे . विशेष करून त्यांनी विविध राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविलेले आहे
आपल्या लेखणीतून समाजाच्या व्यथा मांडण्याचे कार्य त्यांनी केले आहे . त्यांना नुकतेच
काव्यगौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. या आधी ही त्यांना ऑथर ऑफ द इयर २०२१
, समाजभूषण , माय मराठी अशा पुरस्काराने गौरविण्यात आले होते . खुळे यांच्या कार्याची
दखल म्हणून अ. भा . प . म . परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी दत्तात्रय खुळे
यांची मराठवाडा विभाग सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे .
त्या बद्दल त्यांचे सर्व समाजबांधवाकडुन अभिनंदन करण्यांत आले