
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात वाढ होत आहे. येत्या काही तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे २२,००० ते २५,००० क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे खडकवासला, पानशेत व वरसगाव धरणाचे प्रकल्प सहाय्यक अभियंता श्री. यो. स. भंडलकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.