
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार- बाजीराव गायकवाड
कंधार:- ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे, याला ” वारसा मुशाफिरी ” (हेरिटेज वॉक) असे म्हणतात.पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी कंधार यांच्या तर्फे मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिनानिमित्त_हेरिटेज_वॉक चे आयोजन करण्यात आले तसेच माजी नगराध्यक्ष, दलित मित्र पुरस्कृत, स्वतंत्र सेनानी श्री_रामराव_पवार_साहेब त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सर्व प्रथम का. लक्ष्मीबाई रामराव पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मा.रामराव पवार साहेब यांचा #सन्मान करण्यात आला.
यावेळी
कंधार पंचायत समितीचे अधिकारी BO साहेब, मनोविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. बाबुराव पुलकुंडवार साहेब,BDO साहेब, विस्तार अधिकारी साहेब, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.