
दैनिक चालु वार्ता मराठवाडा उपसंपादक- ओंकार लव्हेकर
कंधार शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये किल्ला व त्याच्या बाजूस खूप मोठे तळे या तळ्याला अर्थात जलतुंग समुद्र असे संबोधल्या जाते. कारण या तळ्यामुळे खरंतर शहराचे शान वाढल्या जाते.
कंधार शहरांमध्ये प्रसिद्ध हाजीसह्या दर्गा आहे. तसेच साधु महाराज संस्थान, शिवावरला गणपती, किल्ला, खडंकी माता मंदिर व शहराला सौंदर्य प्राप्त करणारा हा जलतुंग समुद्र शहराची शान वाढवतो .
पण गेले काही दिवस या तळ्याला अर्थात समुद्राला फार जास्त प्रमाणात पाणी नव्हते. पण यावर्षी गेल्या दोन महिन्यात अति पाऊस पडल्यामुळे सदरील जलतुंग समुद्र हा पूर्णतः तुडुंब भरला आहे. त्यामुळे याच्या लगत असणारी कोट बाजार, मानसपुरी, सुजान वाडी या गावांना अजून जर जास्त पाऊस पडला तर धोका होऊ शकतो. त्यामुळे या गावांना सतर्क राहण्याची नितांत गरज आहे. आणि प्रशासनाने सुद्धा दखल घेण्याची गरज आहे.
इ.स.1983 मध्ये असाच हा जलतुंग समुद्र पूर्णतः भरला होता त्यावेळेस या गावांना पुराचा तडाका बसला होता त्यावेळेस या जनतेला कंधारच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हलविण्यात आले होते व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती अशीच वेळ यावेळेस येऊ शकते असे चित्र निर्माण झाले आहे.
सदरील समुद्रात आजूबाजूला झाडे झुडपे मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे खूप प्रमाणात या तळ्याला विद्रूपीकरण आले आहे.
सदरील तळे प्रशासनाने जातीने लक्ष घालून आजूबाजूची झाडे स्वच्छ करून याच बाजूला कंधारचे वैभव असलेले श्री शिवाजी कॉलेज येथे शेकडो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात. तरी सदरील या तळ्यावरील रस्ता हा सुद्धा खूप खराब झाला असून तो त्वरित दुरुस्त करणे गरजेचे वाटत आहे.